Skip to main content

Paris - 1

 

Paris Day 1 - Around Louvre, Arc de Triomphe and Palais Garnier (Opera House)


 ०८ मे, २०१८

   सकाळी ५ वाजताच उठलो.. झोप पूर्ण झाली नव्हतीच, हवेत प्रचंड गारठा होता त्यामुळे परत पांघरुण ओढून झोपायचा मोह आवरत नव्हता. शेवटी २ मिनिटं, ५ मिनिटं करुन उठलो, पटापट आवरु म्हणूनही ६.१५ होऊन गेले होते. अजून मेट्रो पकडायची होती, तेथून पुढे काही अंतर चालून जाऊन मग ब्रुजला जाणाऱ्या बसचा थांबा होता.

   धावतच खाली उतरलो, काही अंतर पुढे गेलो आणि लक्षात आले, अरे आपण दुसऱ्या देशात चाललोय, दुसऱ्या गावाला नाही. व्हिसा, पासपोर्ट काहीच बरोबर घेतले नव्हते. परत माघारी येऊन पासपोर्ट्स घेतले आणि अक्षरशः धावतच स्टेशन गाठले. अर्थात त्यामुळे डोळ्यावर असलेली झोप उडून गेली. दोनच मिनिटांत मेट्रो आली. मेट्रोचे अंतरंग रंगेबिरंगी दिवे, रंगीत खुर्च्यांमुळे एकदम झांन्गो वाटत होते. १५ मिनिटांतच स्टॉप आला. जिने चढून मुख्य रस्त्यावर आलो आणि समोरचं दृश्य बघून स्तिमीतच झालो. लगेच कॅमेरा काढला आणि क्लिक-क्लीकाट चालू केला.





  जुन्या इमारती, नक्षीदार पूल, स्वच्छ पाण्याने दुथडी भरुन वाहणारी seine नदी, वाऱ्याच्या झुळकीने डुलणारी झाड.. वाह सगळंच लाजवाब होतं. ७ वाजायला पाचंच मिनिटं बाकी होती, “लवकर चल, लवकर चल” म्हणून बायको घाई करत होती, पण माझ्यातला फोटोग्राफर मला शांत बसू देईना. शेवटी त्यांना पुढे जाऊन बस पकडा, मी आलोच २ मिनिटांत म्हणून पुढे पाठवले.

    सूर्याची कोमल किरणं इमारतींना अजूनच मोहक बनवत होती. किती फोटो काढू आणि किती नाही असे झालं होतं. त्या पुलाचे आणि नदीचे अजून काही क्लोज-शॉट्स घेऊन मागे वळलो आणि समोर दिसले ते अवाढव्य पसरलेले Louvre Museum. असं म्हणतात हे म्युझियम व्यवस्थित बघायचं असेल तर निदान दीड ते दोन दिवस लागतात. अनेक उच्च दर्जाच्या कलाकृतींबरोबरच
जगप्रसिद्ध ‘मोनालिसा’च पेंटींग सुद्धा इथेच आहे.














Louvre Museum

दुर वर बस थांबलेली दिसत होती, भरभर चालतानाच आजूबाजूचे अजून काही फोटो घेतले आणि बसकडे धावलो.








   बसमध्ये बसतानाच आपण जेथे जाणार आहोत तिथला नकाशा आणि बघायची प्रेक्षणीय ठिकाणं, त्याची माहिती वगैरे दिली गेली. संध्याकाळी बस बिचाऱ्या ड्रॉयव्हरलाच स्वच्छ करावी लागते त्यामुळे बस मध्ये काहीही खाणं-पिणं अलाऊड नाही वगैरे सूचना देऊन बस निघाली.

   पॅरिस अजूनही सुस्तावलेलेच होते, रस्ते बरेचसे रिकामेच होते. मधूनच एखादी पोर्शे किंवा फेरारी कानाला सुखावणारा आवाज करत जाई तोच काय तो आवाज. बाकी गर्दी असो कि नसो, एक जात सगळेजण सिग्नल पाळत होते. बंद काचेतून पॅरिसचा सौदंर्य न्याहाळत असतानाच बाहेरच्या ठिकाणांची माहिती टूर-गाईड देत होता ते ऐकत होतो. बसमधील बहुसंख्य प्रवासी स्पॅनिश
असावेत, त्यामुळे टूर गाईड सगळी माहिती आधी फ्रेंच, मग स्पॅनिश आणि मग इंग्लिश मधून सांगत होता. 


























 

Mobile & GoPro clicks











I'm the author and owner of the most popular Marathi Novels blog - डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा https://manaatale.wordpress.com Here i will be sharing my travel stories

Comments