Skip to main content

सिंगापूर आणि न दिसलेला बिबट्या

 "फाटून हातात येणे" ह्या म्हणीचा तंतोतंत प्रत्यय आज आला .  😰

दर शनिवार-रविवारच्या रीतिरिवाजाप्रमाणे बाईक राईडला सकाळी बाहेर पडलो. पाबे घाट पार करुन तोरणा-गुंजवणी धरणामार्गे  मढ़े घाटात गेलो. रस्त्यात पाट्या नसल्याने विचारत विचारच जात होतो.

काही फोटो काढून माघारी वळलो. रस्ता अगदीच  ओबड धाबड आणि निर्मनुष्य होता. काही अंतरच झाले असेल तोच जाताना  शेवटचा रस्ता एका गाडीवरच्या कुटुंबाला विचारला होता ते परत जाताना दिसले. थोड़े अंतर पुढे गेलो तर मोटरसायकलवर दोघ जण रस्त्यातच थांबले होते, आम्हाला येताना बघताच त्यांनी थांबायची खुण केली. रस्ता अगदीच निर्मनुष्य होता, उगाच कोण कुठली लोक , कश्याला थांबा म्हणून मी न थांबताच जाणार होतो, पण मी थांबणार नाही ऐसे लक्षात येताच तो अजूनच जोर जोरात हात दाखवायला लागला म्हणून थांबलो.

पुढे जाऊ नका, रस्त्यात बिबट्या बसलाय. 🐯आम्ही थांबेपर्यन्त तो म्हणाला .

आम्हाला वाटलं काहीतरी चुकीचे ऐकले, म्हणून परत विचारले 

 बिबट्या आहे पुढे .. हे काय ह्यांनी बघितला .. मागे हात दाखवत तो म्हणाला .. तो पर्यन्त मगाशी मागे वळून गेलेले ते कुटुंब परत येताना दिसले.


जाम टरकलेले होते , त्यांनी सांगितले, पुढच्या वळणावर बिबट्या बसलाय रस्त्यात म्हणून आम्ही वळून आलो.

जाम टरकली. निर्मनुष्य रस्ता, जवळपास कुठलीच वस्ती नाही, दाट झाडी आणि रस्त्यात आम्ही तीन टूव्हीलर्स .

गाड्या बंद करुन गप उभे राहिलो, काही सूचेना, पुढे जायची हिम्मत होईना.


दहा मिनिट अशीच गेली, इतक्यात समोरून एक तरुण वायु वेगाने बाइक वरून आला. आम्हाला बघताच तो थांबला आणि म्हणाला पुढे बिबट्या बसलय, जाऊ नका, नशिबाने वाचलो आणि आलो, वेगात होतो त्यामुळे पटकन थंबतच नहीं ाले.

सॉलिड टरकली. 

एखादी कार आली तर बर, मागोमाग जाता येईल म्हणून 5 मिनिट गप उभे, पण कुणीच येईना.

एव्हाना अजुन एक जण येऊन थांबला. शेवटी मनाचा हिय्या करुन सगळ्यांनी एकत्र जोर जोरात हॉर्न वाजवत जायचे ठरले.

इतर वेळी जंगल सफारी मध्ये वाघ दिसावा म्हणून आपण प्रार्थना करतो, पण आत्ता बिबट्या दिसु नये म्हणून सगळे प्रार्थना करत होतो.


हळू हळू सगळे पुढे सर्किट राहिलो आणि शेवटी ज़्या ठिकाणी बिबट्या दिसला होता तो रस्ता रिकामा पाहुन जिवात जीव आला.

अर्थात नंतर कुठली ठिकाण शोधतोस बाईक राइडला, मगाशीच सांगत होते परत जाऊ, पण नाही ऐकलेस .. हे पल्लवी  कडून ऐकून जीव गेला ते वेगळेच


Fort Rajgad on the backdrop


Mighty Torna on the backdrop


Morning Glow



Fort Rajgad on Left, Torna on Right

Gunjawani Dam

















I'm the author and owner of the most popular Marathi Novels blog - डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा https://manaatale.wordpress.com Here i will be sharing my travel stories

Comments